*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शेतकऱ्याची सकाळ..*
(अष्टाक्षरी)
झुंजू मुंजू झालं आता,
उजाडले सारीकडे!
पूर्व दिशेला गं दिसे,
सूर्यकिरणांचे सडे !…१
कुठे गायीच्या गोठ्यात,
हंबरे वासरू छोटे !
गायीचा वात्सल्य पान्हा,
झुरू झुरू प्रेम वाटे !..२
पहाट द्रुष्य खेड्याचे,
सुखावते मनालाही !
शेतकऱ्याची सावली,
साऱ्या आसमंती राही!..३
पहाट वेळ होताच ,
पाय गोठ्याकडे वळे!
हाती चरवी घेऊनी,
राधा दुग्धधारा काढे!..४
मराठी मातीची ओढ,
शेतकरी मना फार !
गाय वासरू महती,
वाटे शेतकऱ्यां थोर !…५
उज्वला सहस्रबुद्धे
