महात्मा बसवेश्वर उद्यान – (निगडी) :
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मनपा व मल्लिकार्जुन प्रतिष्ठान बसवेश्वर जयंती साजरी करते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
अक्षय तृतीयाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मनपा व मल्लिकार्जुन प्रतिष्ठान आयोजित महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवात लिंगायत सखी सौ सुनीता नगरकर, सौ.वैशाली घाटके, सौ शामा शिवपुजे, सौ मनीषा खोचरे, सौ राजश्री हंचे, कुमारी स्वरा हंचे, अमूल्या यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या वचनावर आधारित “तव नामाचे अमृत साचवुनी वाणीत रूप तुझे लोचनात रेखिले” हे वचन नृत्य सादर केले.
बसवनामाच्या अमृताने बसव भक्तांना, उपस्थित प्रेक्षकांना आनंदीत केले. हा संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय झाला.
