You are currently viewing आठवणींच्या हिंदोळ्यावर!

आठवणींच्या हिंदोळ्यावर!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आठवणींच्या हिंदोळ्यावर!*

 

आठवणींच्या हिंदोळ्यावर ऊगाच बसती,

स्मृती पांखरे तिथेच फेर धरती,

भुतकाळची स्वप्न पाखरें ,

नयनांमधे पाणी भरती,

मनी अबोल प्रीत फुलली होती,

जीव घाबरे परि हे गुज व्यक्त न होई,

कोणास सांगू कसे सांगु करता,

मनी काहुर अन् वेळ निघुन जाई.

आठवणींच्या हिंदोळ्यावर ,

मैत्रीणींच्या गंमती जंमती,

अलगद हंसवत झुलत रहाती,

आता गलबले जीव परि ,

फिरून परत कधी न येती.

आठवणींच्या हिंदोळ्यावर,

मीच मग आठवत राही,

लग्न मुले आणि संसार,

ऊगाच मी त्यात स्वत:ला पाही.

 

अनुराधा जोशी

अंधेरी. मुं. 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा