You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९६ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९६ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९६ वे

अध्याय – १६ वा , कविता- ६ वी

___________________________

 

आनंदाने भाऊ कवर बोलला । भावयजयीस म्हणाला ।

कर सुरुवात स्वयंपाकाला । कांदा,भाजी आंबड्याची । भाकरी, ऊन पिठले हिरवी मिर्ची, देईन स्वामीला ।। १ ।।

 

भावजयीने शिदोरी करून दिली । भाऊ गेला स्टेशनावरी।

बाराची गाडी चुकली । स्वारी भाऊंची उशिरा शेगावी पोंचली।।२ ।।

 

कवराच्या जीवा लागला घोर । परी नशीब पहा किती थोर।

वाट पहात बसले होते त्याची गुरूवर । मठामध्ये ।। ३ ।।

 

भाऊची शिदोरी स्वामींनी ग्रहण केली । प्रसाद म्हणून भाऊस दिली । स्वामींची थोरवी पटली। त्या समयी सकलांना ।। ४ ।।

 

कृपा असू द्या स्वामी,भाऊ वदला । स्वामींनी त्यास आशीर्वाद दिला । भाऊ डॉक्टर झाला । स्वामी कृपेने ।।५।।

 

तुकाराम माळी भाविक फार । येतसे दर्शना वारंवार ।

स्वामी भेटीचा आनंद त्यास फार । भक्त हा स्वामींचा ।।६।।

 

शेतामध्ये तुकाराम होता बसलेला । अवचित प्रकार घडला ।

शिकाऱ्याने सश्यावर नेम धरला । त्यातील छरा एक लागला तुकारामाला ।७ ।।

 

छरा लागलेला । मस्तकात शिरला । तुकाराम त्रासला।

असह्य वेदनेने ।। ८ ।।

 

मठात त्याने सेवा सुरू केली । सेवा त्याची फलद झाली ।

शुद्ध भावना मनातली । जाणुनी, स्वामींनी कृपा केली ।। ९ ।।

 

निष्ठेचे उदाहरण असे । तुकाराम माळ्या जसे । मनावर ठसे । सकल जनांच्या ।। १० ।।

*******

।। इति १६ वा अध्याय समाप्त ।।

*******************

अध्याय- १७ वा होईल आरंभ..

करी क्रमशः लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी अरुणदास- अरुण वि. देशपांडे -पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा