You are currently viewing भार कशाला..

भार कशाला..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

पादाकुलक वृत्त “

*भार कशाला..*

 

शाल फुलांचे हार कशाला..?

आभाराचे भार कशाला..?

 

जितेपणी जर मरतो आहे

मारायाचे ठार कशाला..?

 

जीव जिवाला देते पत्नी

हवीच फुलगी नार कशाला..?

 

घायाळ करी शब्द मानवा

तलवारीचे वार कशाला..?

 

जाणिव आहे सत्याची मज

घेउ जाणुनी सार कशाला..?

 

सोबत होते, सज्जन होते

दुरावता तक्रार कशाला..?

 

नाते तुटले, मनही तुटले

तरी जपू अलवार कशाला..?

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा