*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी कामगार महाराष्ट्राचा*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मी कामगार महाराष्ट्राचा
वाढवतो महाराष्ट्राची शान
उज्वल भविष्यासाठी मी
उजळी कष्ट रत्नांची खाण
मी कामगार महाराष्ट्राचा
अभिमानाने जगतो आहे
परिस्थिती गरिबीची पण
ताठ मानेने वागतो आहे
मी कामगार महाराष्ट्राचा
करेन सदैव गरजुंची सेवा
कर्तव्यास नेहमी तत्पर
जपेन कर्तव्यदक्षतेचा ठेवा
मी कामगार महाराष्ट्राचा
ऋण समाजाचे फेडतो
एकजूटता ठेवून नेहमी
मालकशाहीला झुगारतो
मी कामगार महाराष्ट्राचा
मनापासून काम करतो
दुरुपयोग वेळेचा न करता
प्रत्येक काम तडीस नेतो
मी कामगार महाराष्ट्राचा
संस्कृतीचा आहे मला मान
भूमी उजळेल कष्टाने मी
मातृभूमीत गुंतले प्राण
सौ कविता किरण वालावलकर
कर्नाटक दावणगिरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

