You are currently viewing जिल्हा युवा पुरस्काराने संजीवनी संस्था सन्मानित

जिल्हा युवा पुरस्काराने संजीवनी संस्था सन्मानित

हा तर माझ्या मातीचा सन्मान – डॉ निवृत्ती जाधव

 

केळवद ता चिखली :  येथिल सामाजिक कार्य करणारी संजीवनी बहू उद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था सन – २०२२ -२३ या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी पात्र ठरली असून जिल्हास्तरीय पुरस्काराने १ मे महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर सन्मानित करण्यात आली.

जिल्हा क्रिडा अधिकारी बुलढाणा यांच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक सेवा देणाऱ्या व्यक्ती संस्था, यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यमान जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्याचे पालक मंत्री यांचे हस्ते प्रोत्साहन पर सन्मानित करण्यात येते . सन २०२२ ते २३ च्या वर्षासाठी सदर विषयान्वये विविध स्तरातून प्रस्ताव मा घविण्यात आले त्यापैकी केळवद ता चिखली,जि . बुलठाणा येथिल सामाजिक एनजीओ संस्था संजीवनी बहू . शिक्षण प्रसारक संस्था केळवद यांना दि १ मे महाराष्ट्र व कामगार दिनाच्या पर्वावर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बुलढाणा जिल्हाधिकारी मा. डॉ. किरण पाटील, व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. मकरंद पाटील साहेब, तसेच क्रिडा अधिकारी मा. बी. एस महानकर बुलढाणा, आणि जिल्हयातील अनेक पुरस्कारार्थी तसेच संस्थेचे डॉ. निवृत्ती भाऊ जाधव, यांनी सदर पुरस्कार स्विकारला.

यापूर्वीही याच संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सन्मानाचा फुले शाहू आंबेडकर पुरस्कार मुंबई येथे मुख्यमंत्री आणि समाज कल्याण मंत्री यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला आहे. हा माझा पुरस्कार नसून माझ्या गावाचा आहे असे डॉ. निवृत्ती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजीवनी जाधव, सौ उज्वला जाधव, श्री विठठल जाधव, प्रशांत सोनुने, किशोर पाटील, शाहीर मनोहर पवार, काकडे, जयश्री बोराडे, खिल्लारे मॅडम, आदी उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाल्याने केळवद गावात उत्साहाचे वातावरणात ग्राम पंचायत केळवदच्या वतीने नागरी सत्कारही करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा