महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय अपघात विभागाला दोन बॅटरीचा इन्वर्टर सुपूर्त.
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शहर व गावा गावातून सोमवार ते शनिवार जवळपास 400 ते 450 रुग्ण दर दिवशी तपासणीसाठी येतात त्या रुग्णांना योग्य सेवा मिळावी त्याकरिता येथील डॉक्टर, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर,सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना या नेहमीच कार्यरत असतात.
पावसाळ्यामध्ये लाईट ये-जा करत असते त्यामुळे त्याचा फटका अपघात विभागाला बसू नये त्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा मुद्राळे,रवी जाधव ,राजे प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष तळवणेकर,विरंश टूर अँड ट्रॅव्हलर्स चे मालक अजित माठेकर,दक्षता सुर्वे -माठेकर, हनुमान मित्र मंडळ उभा बाजार ओमकार मसुरकर,प्रशांत वाळके,सुवर्णकार दीपक मडगावकर,जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर या दात्यांनी या उपक्रमासाठी जवळपास 35 हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर हॉस्पिटलला देण्यासाठी आर्थिक सहकार्य केले.
या कार्यक्रमाप्रसंगी अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर हे एवळे, डॉ, अंबापूरकर डॉ, चितारी, डॉ, सावंत, राजू मसुरकर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शैलेश नाईक, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, कमलाकर कदम, तेजल पेडणेकर, सचिता गावडे समीरा खलील,रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, हेलन निबरे,अजित माठेकर, प्रथमेश प्रभू,अनिकेत पाटणकर, मेहर पडते, वसंत सावंत,संदीप निवळे, प्रसाद नाटेकर, राजू धारपवार दीपक मडगावकर,ओमकार मसुरकर, प्रशांत वाळके,आडारकर, सिस्टर स्टाफ कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आज पर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून व दात्यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय व काही प्रमाणात जानकीबाई सुतिकागृह या हॉस्पिटललांसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या व दात्यांच्या माध्यमातून जवळपास
1 लाख 75 हजार हून जास्त किमतीचे रुग्णपयोगी साहित्य देण्यात आले.
तसेच समता महिला मंडळ यांच्यामार्फत एक लाख हुन अधिक किमतीचा वॉटर फिल्टर कुलर सिस्टीम बसवण्यात आली, राजू भालेकर, स्वामी पोकळे, व प्रफुल्ल सांगोडकर यांच्यामार्फत 30000 रुपये किमतीचे दहा स्टॅन्ड फॅन देण्यात आले, तसेच कांचन हळदणकर यांच्यामार्फत पाणी गरम करण्यासाठी प्रत्येक विभागाला सहा इलेक्ट्रिक कॅटल देण्यात आले तर माजी नगरसेवक सुधीर आरीवडेकर व
कै. राकेश नेवगी यांच्याकडून अति दक्षता विभागाला वॉटर कुलर देण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ती अपर्णा कोठावळे यांनी सिटीस्कॅन विभागाला 12 खुर्ची दिल्या. श्रीमती श्रीमती सुमेधा आराबेकर यांच्याकडून 45 रिलॅक्स चेअर हॉस्पिटल साठी प्राप्त झाल्या.
तसेच सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध वकील बापू गव्हाणकर यांच्याकडून वाळके मास्तर जयंतीनिमित्त 50 खुर्च्या देण्यात आल्या होत्या.
अशाप्रकारे सामाजिक भान ठेवून समाजातील दात्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी व गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी सदर साहित्य भेटवस्त म्हणून दिल्या या सर्व दात्यांचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवि जाधव यांनी आभार मानले.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांची मदत घेऊन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मूलभूत सोयी सुविधांनी सुसज्ज बनवण्याचा ध्यास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. यासाठी समाज प्रेमी व दाते भरभरून साथ देत आहेत.

