You are currently viewing भारतीय किसान संघ कोलगाव चा वतीने अक्षय तृतीया निमित्त बीज पूजन व बीजप्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम

भारतीय किसान संघ कोलगाव चा वतीने अक्षय तृतीया निमित्त बीज पूजन व बीजप्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम

*भारतीय किसान संघ कोलगाव चा वतीने अक्षय तृतीया निमित्त बीज पूजन व बीजप्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम

सावंतवाडी

स्थानिक बियाण्याचा क्षय म्हणजे नष्ट न होता ती अक्षय राहावीत व शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा या संकल्पाने भारतीय किसान संघ,ग्रामसमिती कोलगाव, ता.सावंतवाडी च्या वतीने बीजपूजन व बीजप्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दुग्ध व्यवसायिक श्री.दत्ताराम ठाकूर यांच्या हस्ते बीजपूजन व गाऱ्हाणे घालून करण्यात आली.
*या कार्यक्रमात खरीप हंगामाची पूर्व तयारी व नियोजन, माती परीक्षण महत्त्व, बीज प्रक्रिया महत्व व उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक, ऍग्री स्टॅक माहिती, भात बियाणे निवड व आधुनिक लागवड पद्धती, पारंपरिक बियाणे संवर्धन महत्व, कृषी विभागाचा योजना या विषयी कोलगाव चे कृषिसहाय्यक श्री अक्षय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.* श्री मनोहर ठिकार यांनी भारतीय किसान संघाची थोडक्यात माहिती सांगितली.कार्यक्रमास कोलगाव मधील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी *सावंतवाडी तालुका मंडळ कृषी अधिकारी श्री. मनोज देवकर, दोडामार्ग तालुका कृषी अधिकारी श्री. सौरभ कदम, भारतीय किसान संघ चे श्री मनोहर ठिकार व श्री अभय भिडे* यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामसमिती अध्यक्ष श्री मुकेश ठाकूर यांनी केले. यावेळी समिती सदस्य रुपेश परब,अभिजीत सावंत , विद्धेश धुरी व शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा