*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*क्षण सुखाचे*
आयुष्यात एका विशिष्ठ ध्यासासाठी काही केलेल्या कष्टांचं जेव्हा सार्थक होतं तेव्हा तो क्षण नक्कीच सुखाचा असतो.
आपोआप काहीवेळा काही मनासारख्या गोष्टी सहज मिळतात तोही क्षण सुखाचा असतो.
मिळालेले यश, बक्षिस, पुरस्कार शिष्यवृत्ती जेव्हा आपल्याच अगदी जवळच्याने जरी मिळवला तरी तो क्षण आनंदाचाच असतो.
आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतात. खुप सुख मिळवतो त्यातुन. लोकांना सहभागी करतो मिठाई वाटतो.
काही वेळा रोजच्या धकाधकीत हळूहळू तो आनंद कमी होत जातो. इतर तर विसरूनही जातात
सुखाचे काही क्षण काही काळानंतर सुद्धा सुख आनंद देतात. कधी हंसवतात कधी रडवतात. कधी कधी त्या सुखाच्या क्षणांना कवटाळुन गोंजारायला खुप मजा येते.
याशिवाय ही अनेक सुखाचे क्षण काळजात कुलूपबंद ठेवलेले असतात.
‘आई’….बायको..आजी.. या भुमिकेतुन जाताना अनेक क्षण सुखाचे भेटत रहातात.
कधी कधी मी फोटोंचे अल्बम काढुन बसते. शांत निवांत वेळी एकटीच बसुन मी ते क्षण परत जिवंत करते… जगते.. अनुभवते. त्यावेळ इतकाच आनंद परत मिळतो.
आपण मोठ्या झाल्यावर केव्हातरी आपल्याकडे छान बघताना … एखाद्या रूपगर्विते सारखं बघतो.. जणुकाय आपणच फक्त सुंदर आहोत अशा तोर्यात बघतानचा क्षण…. लग्नाच्या पसंतीचा जोडीदाराने टाकलेला कटाक्ष.. लग्नातले सर्व विधी .. पहिलं सासरी पाऊल व झालेलं स्वागत.. पहिली पूजा.. चालू झालेला अनोखा सज्ञप्रवासातले काहीक्षण… बाळाची चाहुल लागते तो क्षण… पहिल्यांदा बाळाला पाहतो तो क्षण.. बाळ हंसतो,बोलतो चालतो ते पहिले क्षण , जोडीदाराच्या प्रमोशनचे क्षण.. मुलगा ऊत्तम मार्काने शालेय . मग महाविद्यालयीन शिक्षण पुरं करतो ते क्षण.. पदवीदान समारंभात रूबाबात मिरवलेल्या आपल्याच मुलांचा गौरव. घरी आलेल्या सुनबाईंची पहिली पाऊल ऊंबरठ्यावर पडतात तो क्षण.. आपण सासु झालो. तो क्षण.. मग नकळत आजी झालो तो क्षण … अगदी शेवटचा म्हणावा असा सुखाचा कळसच… म्हणजे नातवाची मुंज … हे असे आयुष्यात आलेले सुखाचे क्षण आयुष्यातील धडपडीचे सार्थक करून गेले.
या क्षणांनी माझ्या सुखाची परिसीमाच ओलांडली.
आता काळ व त्या त्या व्यक्ती मोठ्या होऊन वेगवान स्पर्धेत धावत आहेत.
मी त्यात सामावुन घेऊ शकत नाही मग अल्बम बघत बसणे हा ही एक परम सुखाचा क्षण निदान माझ्या एकटीपुरेसा लोभस आहे.
अनुराधा जोशी
9820023605
