You are currently viewing वाट तुझी पाहताना

वाट तुझी पाहताना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वाट तुझी पाहताना*

 

वाट तुझी पाहताना

मम नयन शिणले

पावसाच्या सरीपरी

झरझरा बरसले

 

किती दिलीस वचने

भेटी आणि नजराणे

दूर आता राहून तू

करतोस का बहाणे?

 

फुलांवरी झेप घेई

मधुकर एक एका

पोखरते मन माझे

तसा तू उडतोस का?

 

सागराच्या तीरावरी

होतो आपण बसलो

घेउनिया कर करी

मस्त मजेत हसलो

 

कुठे हरवली प्रीति

अन् नजरेची भाषा

येता कवेत तुझिया

मावळल्या मम आशा

 

स्पर्श नुरला सुखाचा

दिलरुबा तू दिलाचा

तार झंकारत नाही

झरा आटला प्रेमाचा

 

गेले सरुनी दिन ते

चंद्र कुठे रे लपला

अवसेची रात जशी

घन तिमिर दाटला

 

*अरुणा मुल्हेरकर*

*ठाणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा