You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्‍वासनानंतर साटेली-भेडशीतील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे..

पालकमंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्‍वासनानंतर साटेली-भेडशीतील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मागे..

उच्चस्तरीय अधिकऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे प्रांताधिकारी यांना पालकमंत्री यांचे लेखी आदेश..

सिंधुदुर्गनगरी

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेल्या शासनाच्या जमिनीवर बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाच्या विरोधातील साटेली-भेडशीतील ग्रामस्थांच्या उपोषणस्थळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी भेट दिली. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी उच्चस्तरीय अधिकऱ्यांमार्फत चौकशी सुरू करुन न्याय मिळवून देऊ असे प्रांतअधिकारी यांना देण्यात आलेले लेखी आदेशाचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा