सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी – भवानीवाडी येथील सावंत-भोसले कुळाची कुलस्वामिनी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव २ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २ मे ला सकाळी ८ वा. मानसन्मान, १० वाजल्यानंतर ओट्या भरणे, दुपारी ३.३० वा. महाप्रसाद, रात्री ८ वाजता मांड भरणे, ११ वा. गोंधळी पूजन, तसेच ३ मे ला सकाळी ६.३० वाजता गोंधळाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाश सावंत-भोसले, पुंडलिक सावंत-भोसले व समस्त भवानीवाडीकर सावंत-भोसले परिवाराकडून करण्यात आले आहे

२ मे रोजी कुणकेरी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव
- Post published:एप्रिल 29, 2025
- Post category:धार्मिक / बातम्या / विशेष / सावंतवाडी / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
