शिल्पग्राम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार…
मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील यांनी दिला दुजोरा*
आशिष सुभेदार यांच्या मागणीला अखेरीस यश
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा तिठ्यावर ते शिल्पग्राम परिसरात कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे दुजोरा मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील यांनी दिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी खासकिलवाडा तिठा ते शिल्पग्राम परिसर येथे वारंवार टाकण्यात येणाऱ्या कचरा प्रश्नी या भागात सिसिटीवव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. या ठिकाणी अनधिकृत पणे कचरा टाकून घाणीचे साम्राज्य पसरवले जात होते तर बऱ्याच वेळा काचाऱ्याला आग लागण्याचे प्रकार ही घडले आहेत. गेले बरेच दिवस बाहेरून काही येणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य केले होते कचरा टिकणे तसेच त्या ठिकाणी दुर्गंधी करून परिसरात रोगराई पसरण्याची भीती नागरिकाकडून व्यक्त होती होती. ही बाब लक्षात घेता श्री सुभेदार यांनी नगरपालिका मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील यांची भेट घेऊन तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली होती त्यावर मुख्याधिकारी सौ पाटील यांनी स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली व त्या ठिकाणी होणाऱ्या कचऱ्याचे गांभीर्य लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे युवा पदाधिकारी आशिष सुभेदार यांच्या मागणीला अखेरीस यश आले असून खासकिलवाडा तिठ्यवर पालिका प्रशासन लवकरच सिसिटीव्ही कॅमेरे बसविणार असा दुजोरा मुख्यअधिकारी सौ पाटील यांनी दिला असून यामुळे कचरा टाकून घाण करणाऱ्यांना जरब बसणार आह व आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे.

