You are currently viewing मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचा मानाचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ स्तंभ लेखक(गद्य) पुरस्कार पांडुरंग कुलकर्णी यांना प्रदान

मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचा मानाचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ स्तंभ लेखक(गद्य) पुरस्कार पांडुरंग कुलकर्णी यांना प्रदान

नाशिक :

 

मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान चा मानाचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ठ स्तंभ लेखक पुरस्कार नाशिक रोड नाशिक येथील प्रतिथयश साहित्यिक, कवी मा. श्री. पांडुरंग वसंत कुलकर्णी यांना रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनात गझलकार ए के शेख यांच्या अध्यक्षतेखाली गझलकार प्रमुख पाहुणे डा. मनोज वराडे जी यांच्या शुभ हस्ते कांदिवली मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे स्नेही, शुभेच्छुक, मित्र परिवार, साहित्यिक, कवी, लेखक यांनी त्यांचे खूप खूप अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ते साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते जय श्री सदगुरु सेवा प्रतिष्ठान नाशिक या सामाजिक संस्थेचेही संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी वाहिनीच्या स्पर्धेतील उपविजेती स्नेहा कुलकर्णी यांचे पिताश्री आहेत. त्यांच्या विविध उपक्रम आणि नियोजनामध्ये समाजसेवक श्री तुळशीदास इंगळे यांचा नेहमीच सहकार्याचा वाटा असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा