कुणकेश्वर येथे २ मे ला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…
देवगड
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, आणि कॅन्सर पेशंट्स एड् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ मे ला श्री कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास येथे सकाळी १० ते २ या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. तेली पुढे म्हणाले, या शिबिरात रक्त, कान, नाक व घसा, रक्तदाब व फुफ्फुस, स्त्रीरोग व स्तन कर्करोग, सर्जिकल आदी तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात प्राथमिक रक्त तपासणी तसेच स्त्रियांकरिता गर्भाशयाच्या पॅप स्मीयर तपासणी देखील केली जाणार आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.
