You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डॉ. अजिंक्य वराडे यांची नियुक्ती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डॉ. अजिंक्य वराडे यांची नियुक्ती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डॉ. अजिंक्य वराडे यांची नियुक्ती

आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली असताना आता आमदार दीपक केसरकर यांच्या अथक प्रयत्नामुळे उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे अस्थिरोगतज्ञ डॉ. अजिंक्य रवींद्र वराडे यांची (Orthopedic Surgeon) म्हणून नियुक्ती झाली आहे. याबाबत आमदार केसरकर यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचे लक्ष वेधले होते.

अस्थिरोग तज्ञांच्या या नियुक्तीमुळे अस्थिरोगांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आता सावंतवाडी येथेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार मिळू शकणार आहेत.

आमदार दीपक केसरकर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळणे हे आपले प्राधान्य आहे. आरोग्य मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आज आपल्याला हे यश मिळाले आहे. लवकरच आणखी काही विशेषज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल, जेणेकरून जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही.’

याच बरोबर जिल्हा रुग्णालयात डॉ. प्रेरणा पांडुरंगराव गायकवाड यांची पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) म्हणून नियुक्ती झाली आहे. पॅथॉलॉजिस्ट यांच्यामुळे रुग्णालयात विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या आणि रोगनिदान अधिक जलद आणि अचूकपणे होऊ शकणार आहे.

या दोन डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला निश्चितच बळकटी मिळणार आहे आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. उर्वरित विशेषज्ञ डॉक्टरांची नियुक्ती देखील लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा