*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माणसा तू कुठे हरवलाय*
माणसा तू
जन्म घेत आलास
माणूस म्हणून
पण खरं सांग
किती माणसे
माणूस म्हणून जगली
किती माणसे
माणसांत जगली
किती माणसांनी माणसाला
माणूस म्हणून ओळखले
जगवले
मलाही माणूस म्हणून जगायचंय
माणसांत राहून
इथे तर पावलोपावली
माणसे भेटतात
पण ती
आचरणाने विचारांनी
श्वापदं, राक्षसी, कुटील
मनाने कपटीच भासतात
काही तर किड्यांमुंग्यां
सारखे स्वार्थी
स्वतःसाठी जगून घेतात
त्यांना इतरांच्या
जगण्याशी काही एक
घेणेदेणे नसते
नरभक्षक झालेत
स्वांतसुखासाठी
माणसांचाच शारीरिक मानसिक
छळ करून
त्यांचाच बळी घेतात
आणि
ढोंगी पणाचा आव आणून
स्वतःची शेखी मिरवतात
गुंड षंढ अतिरेकी
प्रवृत्तीचे बीज पेरतात
माणसात राहून
माणसाचाच गळा घोटतात
देवमाणूस
भेटेल कधीतरी
ह्या एकाच आशेवर
जगतोय हल्ली
मलाही माणूस म्हणून जगायचंय
माणसात राहून
माणसां सोबत
राहतोय मी….
माणसा
तू कुठे हरवलाय…
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
