*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
📓📕📗📙📘📒📔📗📕
जागतिक पुस्तक दिन
केला जातो साजरा
पुस्तक हेच असते
एकांतात मित्र खरा
वाचल तर वाचल
पुस्तकाचा कानमंत्र
आचरावे जीवनात
जगण्याचे नवे तंत्र
पुस्तकाने स्फूरतात
शब्द सुमनांचे रंग
विहारते भावविश्व
करी वाचनात दंग
मनाला रमवतात
पुस्तक हेच शब्दात
उत्साहाने ज्ञानगंगा
नेहमीच वाचकात
विद्यार्थ्यांला जीवनात
वाचनाने मिळे यश
ज्ञानगंगा रुंदावती
नसे त्यास अपयश
पुस्तक सदा असते
मित्र असे शिक्षणाचे
जणू प्रकाश पुस्तक
असतात ते ज्ञानाचे
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक

