*ऑटीझम दिनानिमित्त झाराप जीवदान शाळेला भेट*
*कुडाळ*
ऑटीझम दिनानिमित्त झाराप जीवदान शाळेला भेट देऊन उपस्थित पालकसभेमधे मतिमंद ऑटीझम मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी फादर, जीवदान शाळेचे कर्मचारी, शिक्षकरुंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.यावेळी जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी उपस्थिताना ऑटीझम दिनाची व निरामय योजनेची माहिती दिली. व इतर योजनेचे मार्गदर्शन केले. व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने जिल्हा मतिमंद शाळेला mr kit देण्यात आले.यावेळी ५० हून जास्त पालक उपस्थित होते.
जीवदान शाळेचे परब मॅडम यांनी उपस्थित पालकांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

