वालावल हुमरमळा येथे आज ‘स्वामी अन्नपूर्णा’ नाट्यप्रयोग..
कुडाळ
श्री अतुल बंगे मित्रमंडळ व हुमरमळा वालावल ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता ट्रीकसीनवर स्वामी अन्नपूर्णा हे नाटक श्री रामेश्वर मंदिर हुमरमळा येथे सादर होणार आहे. या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री स्वामी जयंतीचे औचित्य साधुन शनिवार दिनांक 26 रोजी श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये स्वामी अन्नपूर्णा हे ट्रीकसीनवर नाटक श्री दत्त माऊली दशावतार कंपनीचा नाट्य प्रयोग होत असुन या कार्यक्रमाला भाविकांनी संध्याकाळी 5:30 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन हुमरमळा वालावल सरपंच अमृत देसाई व ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर यांनी केले आहे
