You are currently viewing नवीन शिक्षक संच मान्यतेच्या विरोधात २ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

नवीन शिक्षक संच मान्यतेच्या विरोधात २ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

नवीन शिक्षक संच मान्यतेच्या विरोधात २ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

शिक्षक समन्वय समितीचा इशारा; सातशे कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची भीती…

सिंधुदुर्गनगरी

नवीन शिक्षक संच मान्यतेच्या अध्यादेशामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा यासाठी २ मे ला संस्था चालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष जी.ए सामंत यांनी दिली.

दरम्यान या अध्यादेशामुळे जिल्ह्यातील ९८८ पैकी ९१ शाळा शुन्य शिक्षकी होणार आहेत तर ६० शाळा एक शिक्षकी होणार आहे तर केवळ ४७ शाळांमध्ये पुरेसे शिक्षक राहणार आहेत त्याशिवाय सातशे कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे त्यामुळे या आदेशाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी यावेळी समितीच्या वतीने करण्यात आली. आज येथे पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी हा इशारा दिला आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष वामन तर्फे, मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, महासंघ जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत, शिक्षक भारती सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रशांत आडेलकर, माध्यमिक अध्यापक संघ अजय शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब संघटना सचिव अभिजीत जाधव, कास्ट्राईब कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष संदीप कदम, शिक्षक भारती सिंधुदुर्ग कार्यवाह संजय वेतुरेकर यांसह हरिश्चंद्र मांजरेकर, चंद्रकांत चव्हाण, रत्नाकर सरवणकर, राजेंद्र राठोड, हनुमंत वाळके, संदीप कदम, संजय पेंडुरकर, नारायण कोठावळे आदी इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा