भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील जुन्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यामधील महाविद्यालयात इ. ११ वी व १२ वी तसेच त्यानंतरचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नबबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर जुन्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
या योजनेची व्याप्ती जिल्हा व तालुका स्तरापर्यत वाढविण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणित नुकसान होवू नये म्हणुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची 30 एप्रिल 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,सिंधुदुर्ग (02362 228882) या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा.
