पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत आज निषेध सभा…
सावंतवाडी
पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता सावंतवाडी येथील गांधी चौक मैदानात निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने सिताराम गावडे व विश्व हिंदू परिषदेचे विनायक रांगणेकर यांनी केले आहे.

