You are currently viewing संभ्रमित सत्यार्थ

संभ्रमित सत्यार्थ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संभ्रमित सत्यार्थ*

****************

ऋणानुबंध जन्मोजन्मीचे

तरीही योग सारे प्रारब्धाचे

गुंतागुंत ही प्रीतभावनांची

संभ्रमित सत्यार्थ जीवनाचे…..

 

मुठीतली रेती झरझर सरते

दृष्टांत या रित्या ओंजळीचे

ओढ नदीची झुळझुळणारी

तृप्त मिलन व्हावे सागराचे…..

 

अथांगतेची लाट गगनचुंबी

विराट रुपडे त्या भगवंताचे

तिथे विरघळुनी मुक्त व्हावे

द्वार ते उघडते मोक्षमुक्तीचे…..

***********************

 

*©️ वि.ग. सातपुते..( भावकवी )*

📞 *(9766544908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा