You are currently viewing प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन मधून पाच टक्के निधी मच्छीमार समाजाला मिळेल!

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन मधून पाच टक्के निधी मच्छीमार समाजाला मिळेल!

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन मधून पाच टक्के निधी मच्छीमार समाजाला मिळेल!

राज्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी मच्छीमार हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवू

मत्स्य व बंदर विकास मंत्री मंत्री नितेश राणे

सिंधुनगरी

इंडोनेशिया सारखे देशाचे ऐशी टक्के अर्थकारण मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून. आपल्या जिल्ह्याला व महाराष्ट्राला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. म्हणूनच राज्यातील मच्छीमारांच्या विकासासाठी या मच्छीमाराना आता शेतकरी दर्जा दिला आहे. पर्यटनाला जोड असणारे मत्स्य उत्पादन क्षेत्र व मच्छीमाराना तसेच या समाजाला सरकारने संजीवनी दिली आहे. जिल्हा नियोजन पाच टक्के निधी मच्छीमार समाजासाठी राखून ठेवावा व त्या समाजासाठी खर्च करावा असेही धोरण संपूर्ण राज्यभरात लागू होईल. त्यामुळे या जिल्ह्यातील मच्छीमारानी मिळाल्या शेतकरी दर्जा व त्या अनुषंगाने मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी
सिंधुनगरी येथे केले.

जिल्ह्यातील आरोंदा ते विजयदुर्ग पर्यंत चा मच्छीमार समाजातील गावागावातील प्रतिनिधी सिंधुनगरी येथील सिंधुदुर्ग बँकेच्या प्रधान कार्यालयात मंत्री नितेश राणे यांच्या आभारासाठी एकवटले होते. मच्छीमाराना शेतकरी दर्जा देणारा हा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय नितेश राणे या नेतृत्वामुळे झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे अशक्यच शक्य झाले आहे! त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार समाज राणे कुटुंबीयांना विसरणार नाही! खरंतर हा मच्छीमार समाज संघटित नसताना मंत्री नितेश राणे यांच्या आभारासाठी एकत्र आला आहे. त्यांच्या प्रेमामुळे आपुलकीमुळे हा समाज एकत्र आल्याचे भावनिक उद्गार अनेक मच्छीमार नेत्यांनी यावेळी काढले. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी केलेला हा सत्कारही ऐतिहासिक ठरला. स्वतः मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या या सत्काराचे कौतुक केले. जिल्ह्यातील मच्छीपारानी संघटित होऊन केलेल्या या सत्काराला तोड नाही, माझ्यासाठी हा सत्कार फार मोठा आहे. आपल्या घरच्या लोकांनी केलेला हा सत्कार मी कधी विसरणार नाही असेही ते म्हणाले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी या सत्काराचे केलेले नियोजन सर्वांनाच भावणारे होते. अनेक मच्छीमारांचे प्रश्न त्यांनी यानिमित्ताने त्यांच्यासमोर ठेवले. मच्छीमार नेते बाबा मोंडकर, अशोक सारंग, वसंत तांडेल, अशोक सावंत, सेजल परब, विकी तोरसकर, दाजी सावजी, दादा केळुसकर, छोटू सावजी, रघुनाथ जुवाटकर, नितीन परुळेकर, विक्रांत नाईक आधी मच्छीमार नेत्यानी आपले विचार व्यक्त करत असताना मच्छीमार समाजाचे मंत्री नितेश राणे अन्नदाते आहेत, त्यांचे हे ऐतिहासिक काम असून मच्छीमार समाज हे काम सदैव लक्षात ठेवेल. व राणे कुटुंबियांच्या पाठीशी कायम उभा असेल असा विश्वास सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.

मच्छीमार विकासाचा केंद्रबिंदू असेल!

मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व बंदर विभागाचे मंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुळे संधी मिळाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मला मच्छीमारांसाठी शेतकरी दर्जा देता आला. यामुळे शेतकरी वर्गाला मिळणारे अनेक लाभ, अनेक सवलती जिल्हा प्रमाणे राज्यभरातील मच्छीमाराना मिळतील. मच्छीमार हा राज्याच्या विकासामध्ये केंद्रबिंदू असेल या दृष्टीने काम होईल. या भागातील सर्व मच्छीमार बांधवांनी राणे कुटुंबीयांवर प्रेम केले आहे. या पुढच्या काळात मी मंत्री म्हणून मच्छीमारांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. पर्यटना बरोबरच मत्स्य उत्पादनाला या ठिकाणी मोठा वाव आहे. या विकासासाठी अनेक शासन निर्णय घेतले जातील. दरडोई उत्पन्नात या विकासामुळे मोठी भर पडेल व राणे साहेबांचे स्वप्न असलेले चार लाखावरील दरडोई उत्पन्न पूर्णत्वास नेता येईल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. म्हणूनच आता या सर्व योजनांचा फायदा घेऊन मच्छीमार समाजाने पुढाकार घेण्याची व मच्छीमार विकासासाठी अंमलबजावणी करण्याची गरज आहे असं ते म्हणाले.

बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी अंमलबजावणी कक्ष व ड्रोनची नजर हे काम आहे तातडीने हाती घेण्यात आले व त्यामुळे अशा बेकायदेशीर मासेमारीवर अंकुश ठेवला गेला. अशा बेकायदा मासेमारांवर कारवाया सुरू झाल्या. गेली दहा वर्ष आमदार असलो तरी आठ वर्ष विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागले. आता मी सत्तेत आहे. मंत्री आहे! तुमचा हक्काचा घरातला माणूस म्हणून मला ते मिळाले ते मी कृतीतून दाखवेन. आपला एक जवळचा मित्र म्हणून आपल्या समाजासाठी, समाजाच्या विकासासाठी कायम काम करीन अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात दिली.

जिल्ह्यात लवकरच निर्यात केंद्र. सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे मत्स्य व बंदर विकासाला किनारपट्टी प्रदेशातील मंत्री नितेश राणे यांचे राज्याला सक्षम नेतृत्व मिळाले. या नेतृत्वाचा फायदा काय होतो हे अवघ्या काही दिवसात जिल्हा वासे यांनी अनुभवले. जनतेचे अनेक प्रश्न मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून सोडविताना मच्छीमारांसाठी शेतकरी दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या व राज्याच्या उत्पन्नावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. पर्यटन विकासाबरोबरच मत्स्य उत्पादनाला दिलासा देणारा व विकासाला चालना मिळाला हा निर्णय आहे. या निर्णयामुळे बंद पडलेल्या जिल्ह्यातील मच्छीमार सोसायटीना संजीवनी मिळणार आहे. मच्छीमारांची आता शेतकरी म्हणून ओळख झाली आहे. शेतकऱ्यांच्या पंगतीत मच्छीमार आल्याने शेतकऱ्यांची व्याप्ती फार मोठी वाढली आहे. यामुळे या जिल्ह्यात मच्छी उत्पादन क्रांती होईल असा विश्वास आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग बँक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून बांदा येथे अद्ययावत निर्यात केंद्र मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून उभे करण्याचा संकल्प आहे. यासाठी जागेची निश्चिती झाली असून या निर्यात केंद्रात शीतगृहासह निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व यंत्रणा या जिल्ह्यात उभ्या करण्याचा मानस असल्याची माहिती या कार्यक्रमात सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा