हृदय आणि फुफ्फुसाचे पुनरुज्जीवन (सीपीआर) एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य
जिल्हा शल्यचिकित्सक -डॉ. श्रीपाद पाटील
सिंधुदुर्गनगरी
संपूर्ण देशामध्ये सीपीआर प्रशिक्षण हि काळाची गरज आहे व सीपीआर कसा द्यायचा व कोणाला द्यायचा या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील डॉ. सुबोध इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. श्याम पाटील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमित आवळे वैद्यकीय अधिकारी रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, डॉ. तुषार चिपळूणकर वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सीपीआर प्रशिक्षण आयोजित केले जात आहे या कामी विभागीय स्तरावरुन प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर डॉ. योगेश साळे उपप्राचार्य डॉ. विनीत फाळके यांनी आरोग्यविषयक अधिकारी कर्मचारी यांना यावेळी मार्गदर्शन केले.
यामध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण अंतर्गत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक व RBSK वैद्यकीय अधिकारी याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे तसेच पुढील टप्प्यात तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालय रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे.
सीपीआर काय आहे हृदय आणि फुफ्फुसाचे पुनरुज्जीवन एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य प्रशिक्षण : हृदय आणि फुफ्फुसाचे पुनरुज्जीवन (सीपीआर) एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य आहे. जे अचानक हृदयविकार किंवा श्वासोच्छवास थांबल्यास एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. बदलती जीवनशैली वाढला ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे अश्या परिस्थितीत सीपीआरचे महत्व अनमोल आहे. अचानक हृदयविकार झालेस वेळेवर सीपीआर केल्यास व्यक्तीचे जीवन वाचण्याची श्यक्यता अनेक पटींनी वाढते आरोग्य सेवा सुविधामध्ये सुधारणा होत असली तरी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होवू शकतो अशा परिस्थितीत सीपीआर चे ज्ञान आणि कौशल्य सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरते त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सीपीआर चे महत्व जाणून घेणे आणि त्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
हृदय व फुफ्फुसाच्या पुनरुज्जीवनाचे महत्व आणि गरज : हृदय आणि फुफ्फुसाचे पुनरुज्जीवन (सीपीआर) हे एक अत्यंत महत्वाचे जीवनरक्षक कौशल्य आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक थांबते किंवा श्वास घेणे बंद होते तेव्हा हे प्रशिक्षण उपयोगात येते आणि व्यक्तीला वाचविण्याची संधी प्राप्त होते.
जीवन वाचवण्यास मदत : सीपीआर रक्ताभिसरण आणि ऑक्सिजन चा प्रवाह पुन्हा सुरु करुन मेंदू आणि इतर महत्वाच्या अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करते.
मेंदूचे नुकसान टाळण्यास मदत : हृदयाचे ठोके थांबल्यानंतर काही मिनिटांतच मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो ज्यामुळे कायमस्वरूपी नुकसान होवू शकते त्वरित सीपीआर केल्याने हे नुकसान कमी करता येते. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मदतः रुग्णवाहिका येईपर्यंत सीपीआर केलेने रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते.
सामुदायिक प्रतिसाद : ज्ञान समाजात पसरल्यास, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळू शकते यामध्ये अर्भकापासून ते मोठ्या व्यक्तीला सीपीआर ची गरज पड़ते व तो कसा द्यायचा याबाबत सर्वाना प्रशिक्षित केले जाणार आहे.
सीपीआर ची गरज केंव्हा पडते : अचानक हृदयविकार, बुडणे, गुदमरल्यामुळे, विजेचा धक्का, औषधांचा अतिवापर
सीपीआर चे घेवू प्रशिक्षण करूया प्राणांचे रक्षण : सर्वांनी सीपीआर चे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. जेणेकरून वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत आपण एखाद्याचे जीवन वाचवू शकतो.

