You are currently viewing “आपल्या मनातील भावना, अनुभव शब्दांतून व्यक्त करत काव्यसंग्रह, कथासंग्रह पुस्तक रूपात येतो”:- राजन लाखे

“आपल्या मनातील भावना, अनुभव शब्दांतून व्यक्त करत काव्यसंग्रह, कथासंग्रह पुस्तक रूपात येतो”:- राजन लाखे

बिजली नगर चिंचवड-(दिनांक ३३ एप्रिल २०२५)

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड मार्फत जागतिक पुस्तक दिनाचे आयोजन बिजलीनगर चिंचवड कार्यालय येथे करण्यात आले.

विविध साहित्यिकांनी आणलेल्या पुस्तकांचे पूजन या ठिकाणी करण्यात आले व पुस्तकाविषयी भाष्य साहित्यिकांनी व मान्यवरांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन लाखे यांनी केले.

त्यावेळी बोलताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले.

कार्यक्रमात अशोक पगारिया, शहाजी कांबळे, माधुरी डिसोजा, बाबू डिसोजा, राजेंद्र भागवत , संजय जगताप, किरण गावडे यांनी आपले पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले.

रजनी शे़ठ यांनी आभार प्रदर्शन केले.

विनीता ऐनापुरे, किरण जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा