पत्रादेवी चेकपोस्ट येथे झालेल्या अपघातात इन्सुलीतील युवकाचा जागीच मृत्यू
बांदा
पत्रादेवी येथील अबकारी चेकपोस्टसमोर ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वार डॅनी फर्नांडिस (वय २८, रा. इन्सुली) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पत्रादेवी पोलीस घटनेचा पंचनामा करीत आहेत.
