You are currently viewing जाणले मी

जाणले मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गझल रचना*

 

*जाणले मी*

 

ज्ञान आहे श्रेष्ठ जेव्हा जाणले मी

पुस्तकांना दोस्त तेव्हा मानले मी

 

बुद्ध जेव्हा वाचला मी शांत चित्ते

पंचशीलातील सारे बाणले मी

 

टाकल्या मी अंधश्रद्धा, कर्मकांडे

तर्कवादी ग्रंथ सारे आणले मी

 

न्याय, शांती, बंधुतेचा वास जेथे

गाव स्वप्नाचेच तेथे बांधले मी

 

धर्म माझा फक्त आहे मानवाचा

जात, धर्माचे रकाने खोडले मी

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

@ सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

प्रतिक्रिया व्यक्त करा