You are currently viewing उन्हाळा तापू लागलाय, पक्षांसाठी थोडे पाणी ठेवणे आपले आद्य कर्तव्य आहे: दीक्षांत देशपांडे

उन्हाळा तापू लागलाय, पक्षांसाठी थोडे पाणी ठेवणे आपले आद्य कर्तव्य आहे: दीक्षांत देशपांडे

*उन्हाळा तापू लागलाय, पक्षांसाठी थोडे पाणी ठेवणे आपले आद्य कर्तव्य आहे: दीक्षांत देशपांडे*

आकाशात मुक्तपणे फिरणाऱ्या पक्षांना रणरणत्या उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहेत.आता उन्हाळा तापू लागला आहे,तेव्हा या मुक्या पक्षांना थोडे पाणी व अन्न देणे हे आपल्या मानवाचे आद्य कर्तव्यच आहे,असे प्रतिपादन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले,ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयातील पक्षांसाठी दाणा-पाणी सोय या उपक्रमात बोलत होते.
यावेळी कणकवली तालुका तहसीलदार दीक्षांत देशपांडे,तळेरे मंडळ अधिकारी नागावकर,तळेरे तलाठी प्रमोद कोळपकर,तळेरे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव,औदुंबरनगर पोलीस पाटील श्रेया जंगले,कोतवाल तांबे,कणकवली तहसील सेतू कार्यालयातील कर्मचारी,तळेरे उपसरपंच रिया चव्हाण माजी उपसरपंच शैलेश सुर्वे,शाळा समिती सदस्य प्रवीण वरूणकर,संतोष जठार,निलेश सोरप,प्राचार्य अविनाश मांजरेकर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशालेतील इयत्ता सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी घरटे व त्यांना दाणापाण्याची सोय करण्यासाठी सुंदर असे पाणी ठेवण्यासाठीची भांडी तयार केली.
उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत, उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून पिण्याच्या पाण्यासाठी व दोन दाण्यांसाठी पक्ष्यांची होणारी भटकंती थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दाणापाण्याची सोय करणे आपले काम आहे.जरी आपण येथे प्रतिनिधिक स्वरूपात दाणा-पाण्याची सोय करत असलो तरी आपण मानवतावादी दृष्टिकोनातून अंगणात,झाडाखाली,घराच्या टेरेसवर,कंपाउंड वॉलवर,इ. ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे भांडे व थोडे दाणे अन्न म्हणून ठेवा असे आवाहन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रशालेच्या सहा. शिक्षिका सुचिता सुर्वे यांनीही यावेळी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सचिन शेट्ये यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा