मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा प्राप्त…
या निर्णयाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी मानले मनःपूर्वक आभार; मालवणात आनंदोत्सव साजरा
मालवण
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा प्राप्त झाला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाचा संपूर्ण मंत्रिमंडळाचे व महायुतीच्या नेत्यांचे व अधिकारी वर्गाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी मनःपूर्वक आभार मानले आणि सर्व मच्छीमार बांधवांचे अभिनंदन केले व सर्व मच्छिमार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या व मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तसेच आमच्या सिंधुदुर्ग चे पालक मंत्री मा. ना. श्री नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य व्यवसायाला “कृषीचा दर्जा” प्राप्त झाला आहे. आमच्या मच्छिमार बांधवांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी संपूर्ण मंत्रिमंडळाचे व आमच्या महायुतीच्या नेत्यांचे व अधिकारी वर्गाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी मनःपूर्वक आभार मानले आणि सर्व मच्छीमार बांधवांचे अभिनंदन केले. या निर्णया बद्दल मालवण मध्ये आनंद साजरा केला गेला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,भाजपा मच्छिमार सेल जिल्हासंयोजक रविकिरण तोरस्कर, सुदेश आचरेकर, मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, बाबा परब, विजय केनवडेकर,गणेश कुशे, राजन वराडकर, महेश कांदळकर, किसन मांजरेकर उपस्थित होते.

