You are currently viewing वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दोघा चालकांवर कारवाई

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दोघा चालकांवर कारवाई

*सावंतवाडी आंबोली मार्गावर सातळी तिठा येथे ड्रंक अँड ड्राईव्ह गुन्हा दाखल*

 

 *न्यायालयात दहा हजार रुपये दंड*

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्गात अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सिंधुदुर्गात ड्रंक अँड ड्राईव्ह, काळया काचा फिल्मिंग, फॅन्सी नंबर प्लेट, ओव्हर स्पीड,प्रखर लाईट, खाजगी वाहनांवर सरकारी पाट्या व इतर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये वाहन चालकांच्या बेपर्वाहीमुळे अपघात होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक पोलीस कर्तव्यात कसूर न करता वाहनचालकांची तपासणी करीत आहेत.

दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सापळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत धुमाळे,पोलीस नाईक अमोल धुरी यांनी सोमवारी १४ एप्रिलला दुपारी सव्वा तीन वाजता सावंतवाडी आंबोली मार्गावर सातोळीतिठा येथे ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या सांगली तालुक्यातील रावसाहेब श्रीपाद बोरगावे या वाहनचालकाची ब्रेथ अनालाझर मशीन ने तपासणी केली असता तो दोषी आढळल्याने त्याच्यावर m.v. act 185 (A) प्रमाणे कायदेशीर कारवाई करून त्याला सावंतवाडी दिवाणी न्यायालयात हजर केले असता रावसाहेब बोरगावे यास न्यायालयात दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई झाली. तर सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बांदेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्वानंद मुंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गोसावी यांनी १७ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता सावंतवाडी मार्गावर सातोळी तिठा येथे ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या आजरा येथील ऋतिक राजेंद्र सावंत या वाहन चालकाची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करून सावंतवाडी दिवाणी न्यायालयात हजर केले असता ऋतिक राजेंद्र सावंत याला न्यायालयात दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा