*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”ब्रह्मांडाची शीळ”*
ब्रह्मांडाची शीळ आभाळी वाजे मधुर गोड
सृष्टी सुखावे डोलते साद घालितो पवनII धृII
सागर लाटा नाचती भरती ओहोटी नीत
निरागस किनारा आसुसलेला प्रेमानं
येई मधुर आवाज जसे घुंगरू वाजतातII1II
गोवत्सांचा कळप धावतो धूळ उडवीत
गाई हंबरती शेपट्या उंच उभारून
वृक्षवेली हलती पर्ण शीळ वाजल्यानंII2II
कमळा भोवती भ्रमर करिती गुंजन
पक्षी पंखांची फडफड घालीत असे साद
वनांतून दरवळे सुमनांचा सुगंधII3II
मयूर पिसांचा मुकुट घालितो श्रीकृष्ण
सृष्टी बहरते भारावते विलसे उन्मन
शीळ वेणू भगिनी सांभाळती पर्यावरणII4II
श्वासो श्वास चाले प्राणवायू चलन वलन
सजीव जगती शीळे ने आनंदी जीवन
परमेश्वर वाजवी शीळ राहू कृतज्ञII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

