*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्याचे वस्त्र*
——————————
आयुष्याचे वस्त्र ,प्रभु
विणतसे कौशल्याने
सुख दुःख धागेदोरे
गुंफी “तो” आलिप्ततेने.—१
जैसे कर्म तैसे फल
कधी धागे आनंदाचे
कधी विणी “तो “आशेचे
तर कधी निराशेचे——२
तोल राखावा मनाचा
शांत भाव राखा चित्ती
कृष्णमेघ पांगतील
सकारात्म जागे वृत्ती.—–३
०
आयुष्याच्या वस्त्रावर
प्रीत टाक्यांची ही नक्षी
भरा,रंग प्रयत्नांचे
वस्त्र खुलेल हो अक्षी!——४
मनमोर वस्त्रावर
नाचतील हो हर्षाने
नवा हवासा गंध तो
जीव भरे सुगंधाने.—-५
धागेदोरे रेशमाचे
प्रेम, मायेने गुंफावे
वस्त्र मृदु आयुष्याचे
नक्की मिळेल जाणावे.——६
सौ.मंजिरी मुकुंद अनसिंगकर.
नागपूर.2070757854

