वाचन छंद प्रेमी साहित्य समूह प्रस्तुत आणि रोहिणी पब्लिकेशन मुंबई जीवन माझे, विचारधारा कवितासंग्रह, तसेच कवी दर्पण या काव्यसंग्रहाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऑन लाईन प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक कवी लेखक उपस्थित होते. रोहिणी पब्लिकेशन मुंबई यांचे व्यवस्थापक रोहिणी वाघमारे यांच्या शुभहस्ते तीनही काव्यसंग्रहाचे ऑनलाइन पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक श्री मनोहर पवार केळवदकर यांनी केले. जीवन माझे या या काव्यसंग्रहाचे संपादक कवी बबन आराख, विचारधारा काव्यसंग्रहाचे संपादक कृष्णा भालेराव आणि या कवी दर्पण या काव्यसंग्रहाचे संपादक सौ. लतीफा बिहाडे आदी उपस्थित होते. या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हयातून वेगवेगळ्या कवी, लेखकांनी सहभाग घेतला. सर्व प्रथम कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोहर पवार यांनी केले. तसेच रोहीनी पब्लिकेशनच्या वतीने रोहीनी वाघमारे यांनी प्रस्तावना सादर केली. त्यानंतर सर्व उपस्थित संपादक कवी, लेखक, यांच्या साक्षीने रोहीनी वाघमारे यांनी सदर तिनही सुंदर व सुबक काव्य अंकाचे ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. यावेळी सर्व सहभागी कवी, लेखक यांनी या सुंदर सोहळ्यात सहभाग घेवून आनंद व्दिगुणीत केला. प्रकाशन सोहळ्या नंतर लगेच उपस्थितीत सहभागी कविंचा बहारदार काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये सुरुवातीला कवी मनोहर पवार यांनी सुंदर आवाजात आपली रचना सादर करून सुरुवात केली. त्यानंतर लतिफा बिहाडे यांनी सुंदर आशयाचीकाव्य रचना सादर केली. बबन आराख, ज्योती कडू, सौ. आरती लाड, दिपक सरदार, जितेंद्र आमटे, डॉ. अशोक सिरसाठ, डॉ. चंद्रशेखर मुळे, शितल घाणेकर, प्रकाश पांडे, सौ. रेखा देशमूख, चंद्रकात बोर्डे, अशोक मिठबांवकर, सुहास टिपरे, डॉ. श्रद्धा वाशिमकर, निला ताम्हणकर, सुस्मिता रेंदाळकर, मनिषा वराळे, वैशाली शिंदे, ज्योती बनसोड, आदी कवि, कवियत्री यांच्या रचना सादर झाल्यात. आणि त्यांच्या सुंदर अशा रचनाही तिन्ही काव्यसंग्रहात समाविष्ट आहेत. वाचन छंद प्रेमी साहित्य समुह, आणि रोहीनी पब्लीकेशन च्या वतीने रोहीनी वाघमारे मॅडम यांनी सदर प्रकाशन व काव्य सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पूर्वीही रोहीनी प्रकाशनाचे विविध पुस्तकांचे प्रकाशन या पूर्वीच झाले आहेत. दर्जेदार साहित्य काव्य पुस्तक निर्मिती मांडणी व प्रकाशन असलेले रोहीनी पब्लीकेशन सुप्रसिद्ध आहेच. सदर ऑन लाईन कार्यक्रमाचे, प्रकाशन सोहळ्याचे व कवी संमेलनाचे सुंदर सुत्रसंचालन व आभार कवी मनोहर पवार यांनी मानले.

