असे का??
मला आवडे गुलाब ताजा
तुला पाकळी सलते का?
हृदयी उन्नत सुगंध दरवळ
तुझ्याच मनात भलते का?
कोण तुझा मी?अनोळखी ना
हात हाती तू धरते का?
सैल सोडले पाश तुझे मी
जा कुठे घुटमळते का?
सौजन्याच्या वाटेवरती
उभे विषारी काटे का?
तूच बोचरी वेल वनीची
वृक्षाआडून खोटे का ??
सांग कधी मी उगाच
भिनलो
तूच शोषिले ,कळते का?
आठवणींच्या रेघोट्यांचे
चित्र समांतर जुळते का?
हवे तेवढे घ्यावे तू अन
मला द्यायचे स्मरते का?
तृप्त व्हायचे नाटक सारे
तू वेडे हे करते का ?
*सुधीर*जोशी*
*संग्रह अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

