*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हे अस्वस्थ मना*
हे अस्वस्थ मना
असे भरकटू नको
कवितेला सोडून
असा दूर जाऊ नको
तुझ्या शिवाय दुसरे
कोणीतरी आहे का तिला?
उसंत वाटावी म्हणून थोडा
थांबायला काहीच हरकत नाही,
ना कुणाची मना आहे
ना राग रुसवा
हे मना
तुझ्यावर कुणाचा ताबा
आहे की, नियंत्रण आहे
निर्बंध लादले जरी
तरी तू मुक्त आहेस
मग हो व्यक्त
काव्यात
मृदुता नाहीच जमली
तर विखारी होऊन
अंगार पेटव
कवितेला
तुझ्या संगतीची
सवय झाली आहे
हे अस्वस्थ मना
तुझी घालमेल
कवीला वेड लावेल
म्हणून भरकटू नको
कवितेला कवी पासून दूर नेऊ नको…
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.