You are currently viewing चिपी विमानतळावरून सेवा सुरळीत राहण्यासाठी नितेश राणेंचा पुढाकार…

चिपी विमानतळावरून सेवा सुरळीत राहण्यासाठी नितेश राणेंचा पुढाकार…

चिपी विमानतळावरून सेवा सुरळीत राहण्यासाठी नितेश राणेंचा पुढाकार…

“फ्लाय ९१” च्या अधिकाऱ्यांशी चर्चा; सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देणार….

सिंधुदुर्गनगरी

चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरळीत सुरू राहिल्यास त्याचा फायदा पर्यटन वाढीसाठी होणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. विमानतळाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेणार असल्याचे राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. दरम्यान विमानतळ सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मधून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.

चिपी विमानतळावरून होणारी विमान वाहतूक गेले काही दिवस रखडली आहे. त्यामुळे त्याचा मनस्ताप जिल्हावासियांना व पर्यटकांना सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज श्री. राणे यांनी “फ्लाय ९१” कंपनीच्या मंत्रालयात विशेष बैठक घेऊन

अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस, विमानतळाचे प्रमुख कुलदीप सिंग, सिंधुदुर्ग विमानतळाचे कॅप्टन जय सदाणा आदी उपस्थित होते.

त्या बैठकीत नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. काही झाले तरी चिपी विमानतळावरून होणारी उड्डाणे रद्द होणार नाही. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रसंगी हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी विमान वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करू, असे ते म्हणाले. तसेच जिल्हा नियोजनच्या माध्यमातून लवकरच विमानतळाच्या सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा