*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ग्रीष्माची काहिली काहिली…*
ग्रीष्माची काहिली काहिली
माझी प्रिया कुठे राहिली
ग्रीष्माची काहिली काहिली…
पिवळा बहावा पहा फुलला
लाल पळस कसा रंगला
पांगाऱ्याने उन्हे साहिली…
ग्रीष्माची काहिली काहिली…
दूर गेला साजण कुठे
जग आहे किती आडमुठे
फक्त याद त्याची राहिली…
ग्रीष्माची काहिली काहिली…
जाऊ नको असा तू ऽऽऽ दूर
मनी लागे पहा हुरहुर
किती आसवे बघ वाहिली..
ग्रीष्माची काहिली काहिली…
आग ओके बघना तो रवि
मला चांद शीतलता हवी
कशी शोधू गली नि गली…
ग्रीष्माची काहिली काहिली…
ग्रीष्माची काहिली काहिली…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

