भाजपा पडेल मंडल अध्यक्षपदी महेश नारकर यांची फेरनिवड…
देवगड
भाजपा पडेल मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर यांची फेरनिवड करण्यात आली. पक्ष निरीक्षक मनोज रावराणे यांनी आज बंड्या नारकर यांची निवड जाहीर केली. आज झालेल्या नूतन तालुकाध्यक्ष निवडीवेळी महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या नावावर पक्ष निरीक्षक मनोज रावराणे यांच्या उपस्थितीत सर्वांनी शिक्कामोर्तब केले.
यावेळी बाळ खडपे, ज़िल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, अमोल तेली, आरिफ बगदादी,संजय बोंबड़ी,रवि तिर्लोटकर,रामकृष्ण जुवाटकर,अंकुश ठुकरुल,भूषण पोकळे ,अजित राणे,संजय लाड,मकरंद जोशी,संदीप तावड़े,सुनील जाधव,संदीप पुजारे,विश्वनाथ पड़ेलकर,प्रभा वादेकर,महेश पड़वळ,रत्नाकर सर्वनकर, उपस्थित होते.

