– प्रकल्पग्रस्त मागणीवर ठाम
कणकवली
देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे सुमारे २५ वर्षापुर्वी लोरे- फोंडा माळरानावर पुनर्वसन होऊन अद्यापही प्रकल्पग्रस्त प्रमुख नागरी सुविधापासुन वंचित आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या नवीन कुर्ली गावठण येथील प्रलंबित मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्याकरीता प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधदुर्ग येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ (रजि.) च्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण सकाळी ०७:०० वाजल्यापासुन शिस्तबध्दतेने चालु आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या काही वेळेतचं पालकमंत्री नाम. उदय सामंत यांनी सदर उपोषणकत्यास भेट दिली.
प्रकल्पग्रस्ताच्या प्रमुख मागण्यामध्ये नवीन कुर्ली येथे तात्काळ नवीन ग्रामपंचायत स्थापन करणे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यायी शेत जमिन देय असल्याने ती त्वरीत देण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावुन घेणे तसेच प्रमुख १८ नागरी सुविधा तात्काळ पुर्ण कराव्यात अशा प्रमुख मागण्या आहेत या मागण्या व प्रकल्पग्रस्ताची व्यथा जाणुन पालकमंत्री नाम. उदय सामंत यांनी काही आश्वासाने दिली परंतु आता पुरे झाली आश्वासाने.. आता ठोस निर्णयचं हवा..
अशा प्रकल्पग्रस्तांनी घोषण देत जो पर्यत या प्रमुख मागण्याबाबत ठोस निर्णय लागत नाही व त्याप्रकारचं लेखी उत्तर उपोषणकर्त्याना मिळत नाही तोपर्यत उपोषणकत्ये व त्यास समर्थन देणारे प्रकल्पग्रस्त आपल्या मागणीवर ठाम आहेत. सकाळी ०७:०० वाजल्यापासुन सुरु असलेल्या या उपोषणास सुमारे १५० ते २०० प्रकल्पग्रस्त समर्थन देत आहेत विशेष म्हणजे महिला वर्गाची उपस्थितीही लक्षणिय आहे.