You are currently viewing राजकारण

राजकारण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राजकारण*

 

सध्या काय चाललाय राजकारणात

कोणी घोटाळ्यात कोणी गुन्हात अडकताय

नाही त्या हक्कासाठी मोर्चे काढून नको ते झेंडे फडकवताय

 

राजकारणात म्हणजे काय

तेरी भी चूप मेरी भी चूप

आपसात समझोता करून घ्यायचा

काडी वादाची पेटवून द्यायची

दुरून आगीचा डोंब बघायचा

 

देवाधर्माच्या नावाने काय तर

नुसत्याच बढाया मारायच चाललय

सत्तेची लगाम हातात आल्यावर म्हणे

माझं काय कुणावाचून आडलय

 

फक्त अरेरावी आरोप हमरीतुमरी

एकमेकांवर करत रहायची

घरातले वाभाडे बाहेर काढून

इभ्रतीची दवंडी पिटवायची

 

प्रत्येकाची कुंडली प्रत्येकाला माहित असते

म्हणून राजकारणात सगळंच माफ असत

झाकलेल ते झाकलेलंच राहू द्यायचं

उगाच जखमेवर मिठ चोळायचं नसतं

 

अरै छत्रपती शिवरायांच्या भुमीत

छळाचा उद्रेक होताना दिसतोय

जिथे श्री राम पुजला जातो

सांग बरं तिथे कोण माणसासारखा वागतोय

 

आता प्रत्येकाने म्हणे हातात

जाती धर्माचा झेंडा घेतलाय

झेंडा हातातून सुटल्यावर

माहीत आहे कोणी किती जपलाय

 

म्हणून राजकारणात कोणी कुणाच नसतं बाबा

यांच्यापासून दुरच रहायचं

हात जोडून यांच्या मागे मागे

उगाच कशाला पळायचं

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा