वेंगुर्ला :
रेडी येथील प्रसिद्ध श्री गणपतीचा ४९ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, श्रीसत्यविनायक महापूजा, दुपारी आरती, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायं. ४ ते ८ स्थानिक भजने, रात्रौ ८ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.
