You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट

सावंतवाडी

सावंतवाडी व मालवण न्यायालयीन इमारतीचा पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे अँड. संग्राम देसाई,सदस्य /माजी अध्यक्ष BCMG व अँड. परिमल नाईक, जिल्हा अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली व सकारात्मक चर्चा केली. मंत्री राणेंनी संबंधित खात्याचे मंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

त्याचबरोबर सिंधुदुर्गनगरी येथे वकील भवन करीता भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले. यावेळी अँड. संदीप निंबाळकर,अँड. शामराव सावंत,अँड.गोविंद बांदेकर, अँड. स्वरूप पई, अँड. गोवेकर, अँड. पाटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा