You are currently viewing विरह तुमचा सोसत नाही…

विरह तुमचा सोसत नाही…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विरह तुमचा सोसत नाही…*

 

विरह तुमचा सोसत नाही कसं मी सांगू तुम्हाला

नेहमीच द्या ना तुम्ही राया तुमच्या प्रेमाचा हवाला…

 

गुलू गुलू बोला जवळ बसा

दिवसा काठी खूपसे हसा

काय मी आणू मला विचारा, हात लावूनी गालाला….

 

जाईजुईचा नाजुक गजरा

प्रेमळ तुमच्या नेहमी नजरा

जुड्यावरी हो तुम्ही माळता स्पर्श चोरटा कानाला…

 

सोनसाखळ्या माझ्यासाठी

आणि हिऱ्याची चमचम अंगठी

हवेवरी त्या होत स्वार हो फटफटी नेऊ गावाला…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा