You are currently viewing महामानव

महामानव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🎓🎓महामानव🎓🎓*

 

माणुस म्हणुनी जन्मा आला

माणुस म्हणुनी वावरला

माणसातली पाहुन पशुता

दुःखी झाला गहिवरला ।।धृ।।

 

एक शिवाजी होवुन गेला

अल्पवयी अवतार जाहला

कार्य तयाचे पूर्ण कराया

भीम आमुचा अवतरला ।।१।।

 

पाण्याविन ही जशी मासळी

अन्नाविण ही तशी माणसे

अनवाणी या पाहुन नजरा

जीवच याचा तडफडला ।।२।।

 

वस्त्रहीनता नाही निवारा

कोण सुराचा असुर किनारा

फक्त जगावे कोणाकरिता?

विचार येता तळमळला ।।३।।

 

नको खड्ग ते घेत लेखणी

विरोध राहो शांत संयमी

घेत अहिंसा बुद्धाकडुनी

हिंसक अवघा नासवला ।।४।।

 

संविधान ही स्मृतीच आहे

मनुनंतरी भीमच आहे

खग ओजस्वी लोकशाहीचा

महामानवा नमन तुम्हाला ।।५।।

 

*©सर्वस्पर्शी*

©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा