*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भीमरावांचा नारा*
नारा हा भीमरावांचा
जयघोष हा भीमरावांचा
दुमदुम दुमदुम दुमला हो
दुमदुम दुमदुम दुमला
ह्या धरतीवर दुमला हो
तिन्ही लोकी दुमला !!धृ!!
!! जयभीम !!
आंबेडकर घराण्यात जन्म घेतला
रात्रंदिवस अभ्यास केला
उच्च शिक्षण घेऊन
बॅरिस्टर झाला
संविधान लिहून
नावलौकिक मिळवला
असा घटनाकार हा जन्माला हो
त्याचा जयघोष हा दुमला !!१!!
नारा हा. ………………..
……….तिन्ही लोकी दुमका!!धृ!!
!!जयभीम!!
बहूजनांसाठी तो लढला
बौद्ध धर्म स्विकारूनी
समाजाला प्रवाहात आणला
असा बहूजनांचा उद्धारकर्ता झाला हो
त्याचा जयघोष हा दुमका
नारा हा. ………………..
……….तिन्ही लोकी दुमका!!धृ!!
!!जयभीम!!
महाडच्या चवदार तळ्यावर
सत्याग्रह केला
राम मंदिर प्रवेशासाठी
उभा ठाकला
त्याने जातीभेदाचा
नायनाट केला हो
त्याचा जयघोष हा दुमला
नारा हा. ………………..
……….तिन्ही लोकी दुमका!!धृ!!
!!जयभीम!!
भीमराव बहुजनांसाठी झटला
म्हणूनी त्यांच्या जयंतीला
जनसागर हा लोटला
असा महामानव हा
देवरूप आम्हा लाभला हो
त्याचा जयभीम जयघोष दुमला
दुमदुम दुमदुम दुमला हो
दुमदुम दुमदुम दुमला
ह्या धरतीवर दुमला हो
तिन्ही लोकी दुमला
नारा हा. ………………..
……….तिन्ही लोकी दुमका!!धृ!!
!!जयभीम!!
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8208667477.
7588319543.
