You are currently viewing हत्ती तसेच वन्यप्राण्यांपासून उपद्रव हा विषय कायमचा संपवायचा आहे – पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे अभिवचन

हत्ती तसेच वन्यप्राण्यांपासून उपद्रव हा विषय कायमचा संपवायचा आहे – पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे अभिवचन

हत्ती तसेच वन्यप्राण्यांपासून उपद्रव हा विषय कायमचा संपवायचा आहे – पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे अभिवचन

मोर्ले येथील गवस कुटुंबियांचे केले सांत्वन

दोडामार्ग

मोर्ले येथे हत्ती हल्ल्यात मयत झालेल्या शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मोर्ले निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. घडलेली घटना दुर्दैवी आहे. प्रशासनातर्फे गवस कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. एक हत्ती पकडण्यासाठी परवानगी मिळाली आहे. अन्य हत्तींना पकडण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून कायमस्वरूपी मुक्त करणार, असा विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना दिला.

 

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस उपअधीक्षक ऋषिकेश रावले, सहाय्यक उपवनसंरक्षक निलेश लाड, वैभव बोराटे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेद्र म्हापसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सरपच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, गोपाळ गवस, वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, मोर्ले सरपंच संजना धुमासकर, उपसरपंच संतोष मोर्ये, माजी उपसरपंच पंकज गवस, पोलिस पाटील तुकाराम चुरमुरे आदी उपस्थित होते.

 

ना. नितेश राणे म्हणाले, वन्य प्राण्यांपासून उपद्रव हा विषय मला कायमचा संपवायचा आहे. यासाठी सामाजिक संघटना, कोल्हापूर वनविभाग यांच्यासह अनेक जणांशी चर्चा सुरू आहे. गवस कुटुंबियांना तातडीची १० लाखांची प्रशासकीय मदत दिली आहे. आणखी १५ लाख रूपये लवकरच देण्यात येतील. तसेच त्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा