You are currently viewing कावळे आहेत अजून काळे

कावळे आहेत अजून काळे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कावळे आहेत अजून काळे*

 

रस पिऊन कानिफनाथाचा

प्रसन्न दिसते *आज* किती

आठवण येते म्हणून शाळेची

काॅलर मागून *बर्फ टाकती*

//1//

तीन फुटाची होती *उंची*

चिडवायच्या सर्व मैत्रीणी

असून छोटी *भावंडामधे*

नाव पडले म्हणून *राणी*

//2//

रस प्यायची स्पर्धा व्हायची

फेस लागायचा ओठाभवती

चोरून प्यायची गंमत न्यारी

मुंग्या यायच्या काॅलर वरती

//3//

बिंग फुटायचे कसे कळेना

घरी येताच *आई* विचारी

गंडेरी मिळायची खिशामधे

पचायची नाही कधी चोरी

//4//

नातवंडांचे बघता *चाळे*

कुठे होतो आंम्ही वेगळे

फक्त बदलली पिढी जरी

कावळे आहेत अजून काळे

//5//

 

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा